जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही18 JANUARY



*जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही18 JANUARY📆*

Nifty50: 18,308.10
⬆ +52.35(0.29%) 
Sensex : 61,308.91
⬆ +85.88(0.14%)
*सेन्सेक्स 61300 पार, निफ्टी 18308 वर बंद*
बहुतेक आशियाई बाजारातील तेजीच्या दरम्यान या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह बंद झाले. दिवसभर बाजार अस्थिर राहिला आणि बँकिंगमध्ये संमिश्र प्रवृत्तीमुळे दबाव वाढला. सेन्सेक्स 85 अंकांच्या मजबूतीसह 61,308 वर बंद झाला आणि निफ्टी 52 अंकांच्या वाढीसह 18,308 वर बंद झाला.

*बँक ऑफ बडोदाचे 1 फेब्रुवारीपासून नवीन नियम*
बँक ऑफ बडोदा 1 फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू करणार आहे. त्यामध्ये चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन अनिवार्य असेल. जर कन्फर्मेशन नसेल तर चेक परत देखील केला जाऊ शकतो. हा नियम 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिकच्या रकमेच्या चेकवर लागू होईल, चेकमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून बँकेने हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. तसेच बँकने पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशनसाठी 8422009988 या व्हर्चुअल मोबाइल नंबरची सुविधा दिली आहे.

*भारताची शेजारी देश श्रीलंकेला आर्थिक मदत*
 श्रीलंका देशाची परकीय चलनाची तिजोरी जवळपास रिकामी झालेली
आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यानंतर भारताने श्रीलंकेला मदत म्हणून 6 हजार 670 कोटी रुपये कर्ज देण्याची घोषणा केली. त्यामुळे श्रीलंकेचे मुख्य अर्थतज्ञ आणि श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर विजयवर्धने यांनी भारताच्या या भूमिकेचे कौतुक केले.

*मेट्रो ब्रँड्स शेअरमध्ये 20 टक्क्यांची उसळी*
देशातील आघाडीची फुटवेअर रिटेल चैन 'मेट्रो ब्रँड्स लिमिटेड च्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली. मेट्रो ब्रैंड्स लिमिटेडच्या शेअर्सने 20 टक्क्यांपर्यंत उसळी मारली. बीएसईवर कंपनीचे शेअर्स 19.99 टक्क्यांनी वाहून 609.45 रुपयांवर पोहोचले. त्याच वेळी, NSE वर 19.99 टक्क्यांच्या वाढीसह शेअरची अप्पर सर्किटसह 609.50 रुपयांवर पोहोचली.

*कोरोना महामारीत श्रीमंत आणखी श्रीमंत झाले.*
कोरोना महामारीत अनेकांचा रोजगार गेला. अनेकांना मोठे नुकसान झाले. एकीकडे अशी परिस्थिती असताना जगातील सर्वात श्रीमंत 10 उद्योगपतींची संपत्ती दुप्पट झाली. महामारीत टेस्लाचे सीईओ एलन मस्क, अमेझोनचे संस्थापक जेफ बेजोस आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांच्यासह 10 सर्वात श्रीमंत उद्योगपतींची संपत्ती तब्बल 1.5 ट्रिलियन डॉलर झाली. ऑक्सफॅमच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही📰 8 JANUARY📆*

जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही

जानुन घ्या आजचा दिवसातील घडामोडी