Posts

Showing posts from April, 2022

जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही22 April

Image
* जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही 📰  22 APRIL📆* 📊 Nifty50 : 17,392.60 ⬆ +256.05(1.49%) 📈 Sensex  : 57,911.68 ⬆ +874.18(1.53%)📈 📍 * सेन्सेक्स 873 अंकांनी वाढून बंद* सेन्सेक्स आज (21 एप्रिल) 873 अंकांनी वधारून 57,910 च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी 256 अंकांच्या वाढीसह 17,393 च्या पातळीवर बंद झाला आहे. आजच्या व्यवहारात बाजारात चौफेर तेजी आली आहे. निफ्टीवर, बँक आणि वित्तीय निर्देशांक 1.36 टक्के आणि 1.50 टक्के वाढले आहेत. त्याच वेळी आपटी निर्देशांक देखील 1.3 टक्क्यांच्या जवळपास वाढला आहे. 📍 * पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा* गुजरातच्या गांधीनगरमध्ये जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं.. यावेळी मोदींनी मोठी घोषणा केली. 'आयुष थेरपीचा लाभ घेण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी भारत लवकरच एक विशेष आयुष व्हिसा श्रेणी सुरू करणार आहे, असं मोदींनी सांगितलं. आम्ही एक खास आयुष हॉलमार्क बनवणार आहोत, असंही मोदींनी म्हटलं. 📍 * Tata Steel चा मोठा निर्णय, रशियासोबतच्या व्यवसायावर बंदी* पार्श्वभूमी...

जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही📰 16 APRIL

Image
*जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही📰 16 APRIL📆*  Nifty50: 17,475.65 ⬆ -54.65(-0.31%)  Sensex : 58,338.93 ⬆ -237.44(-0.41%)  📌 * फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन पेक्षा ही इथे स्वस्तात मिळतात वस्तू* ॲमेझॉन सारख्या कंपन्या आघाडीवर आहेत. पण कदाचित बऱ्याच भारतात ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. यात फ्लिपकार्ट आणि भारतीयांना हे माहित नसेल की एक सरकारी वेबसाइट आहे जी स्वस्त वस्तू विकते. Gem नावाची (Government e Marketplace) ही सरकारी वेबसाईट आहे. जिथे इतर कोणत्याही ईकॉमर्स साइट्सपेक्षा ऑनलाईन खरेदी स्वस्त आहे.  📌 * इजिप्तने भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली आहे: पीयूष गोयल* जगातील सर्वोच्च गहू आयातदार इजिप्तने भारताला गहू पुरवठादार म्हणून मान्यता दिली आहे, अशी घोषणा वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी केली. रशिया आणि युक्रेन, जे दोन्ही प्रमुख गहू निर्यातदार आहेत, यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेतील गव्हाच्या उपलब्धतेत तीव्र घट होत असताना हा विकास झाला आहे. इजिप्त भारतातून 1 दशलक्ष टन गहू आयात करण्याचा विचार करत आहे.  📌 * सेन्को गोल्ड...

जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही📰 15 APRIL

Image
* जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही📰  15 APRIL📆* Nifty50: 17,475.65 ⬆ -54.65(-0.31%)  Sensex : 58,338.93 ⬆ -237.44(-0.41%) *' अदानी ग्रीन' कंपनीचे महिन्याभरात 50 टक्क्यांनी वाढले शेअर* एका महिन्यात तब्बल 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वर्षी उद्योजक गौतम अदानी यांच्या 'अदानी ग्रीन' या कंपनीच्या शेअरमध्ये कंपनीचा मल्टीबॅगर स्टॉक्स 110 टक्क्यांनी वाढला आहे. तर मागील महिन्यात हा स्टॉक 1822 रुपयावरून 2795 रुपयांपर्यंत म्हणजेच 50 टक्क्यांनी वाढला आहे. * एलन मस्क ट्विटर विकत घेणार, 41 अब्ज डॉलर्सची ऑफर* टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त एलन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. रायटर्सने दिलेल्या वृत्तानुसार मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी तब्बल 41 अब्ज डॉलर्सची ऑफर दिली आहे. याआधी मस्क यांनी दुट्विटरच्या बोर्डातील सदस्यत्वाची ऑफर नाकारली होती. मस्क यांनी ट्विटरमध्ये तब्बल 9 टक्के शेअर्स आधीच विकत घेतले आहेत. * बँक ऑफ इंडियाने फ्युचर रिटेल विरुद्ध दिवाळखोरी कार्यवाहीसाठी फाइल केली* बँक ऑफ इंडियाने गुरुवारी नॅशनल कंप...

जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही14 APRIL📆*

*जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही14 APRIL📆* Nifty50: 17,475.65 ⬆ -54.65(-0.31%) 📉 Sensex : 58,338.93 ⬆ -237.44(-0.41%)📉 📌 *उबर नंतर ओलाने भाड्यात केली 16 टक्क्यांनी वाढ*  दररोज महागाई वाढत आहे. पेट्रोल, डीझेल आणि सीएनजीचे दर वाढल्याने उबेरनंतर ओला या कंपनीने प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. मिनी आणि प्राइम कॅबच्या दरात तब्बल 16 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच मुंबईत टॅक्सी चालकांनीही भाडे वाढ करण्याची मागणी केली आहे. 📌 *मालक खूश, कर्मचाऱ्यांना 100 कार वाटल्या*  चेन्नईची आयटी कंपनी Ideas2IT च्या मालकाने खूश होऊन आपल्या 100 कर्मचाऱ्यांना विविध कार भेट दिल्या आहेत. याशिवाय अन्य काही कर्मचाऱ्यांनाही भेटवस्तू मिळाल्या आहेत. त्यांना कंपनीकडून सोन्याची नाणी आणि आयफोन गिफ्ट मिळाले आहेत. Ideas2IT चे CEO गायत्री विवेकानंदन यांनी आपण आगामी काळात असे आणखी उपक्रम सुरू करण्याची योजना आखत असल्याचे म्हटले आहे. 📌 *आधी यूरोपकडे लक्ष द्या, भारताने अमेरिकेला सुनावले*  भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, अशी अमेरिकेची इच्छा आहे. तशी इच्छा अमेरिकेकडून वॉशिंग्टन येथ...