जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही22 April
*जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही📰 22 APRIL📆*
📊
Nifty50: 17,392.60
⬆ +256.05(1.49%) 📈
Sensex : 57,911.68
📍 *सेन्सेक्स 873 अंकांनी वाढून बंद*
सेन्सेक्स आज (21 एप्रिल) 873 अंकांनी वधारून 57,910 च्या पातळीवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी 256 अंकांच्या वाढीसह 17,393 च्या पातळीवर बंद झाला आहे. आजच्या व्यवहारात बाजारात चौफेर तेजी आली आहे. निफ्टीवर, बँक आणि वित्तीय निर्देशांक 1.36 टक्के आणि 1.50 टक्के वाढले आहेत. त्याच वेळी आपटी निर्देशांक देखील 1.3 टक्क्यांच्या जवळपास वाढला आहे.
📍 *पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा*
गुजरातच्या गांधीनगरमध्ये जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं.. यावेळी मोदींनी मोठी घोषणा केली. 'आयुष थेरपीचा लाभ घेण्यासाठी भारतात येऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी भारत लवकरच एक विशेष आयुष व्हिसा श्रेणी सुरू करणार आहे, असं मोदींनी सांगितलं. आम्ही एक खास आयुष हॉलमार्क बनवणार आहोत, असंही मोदींनी म्हटलं.
📍 *Tata Steel चा मोठा निर्णय, रशियासोबतच्या व्यवसायावर बंदी*
पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. आपण रशियासोबत व्यवसाय भारतातील प्रमुख पोलाद कंपनी टाटा स्टीलने रशिया युक्रेन युद्धाच्या करणे थांबवणार आहे, अशी घोषणा टाटा स्टीलने केली आहे. भारत, यूके आणि नेदरलँड्समधील कंपनीच्या सर्व स्टील उत्पादन साइट्सने रशियावरील त्यांचे अवलंबित्व संपवण्यासाठी कच्च्या मालाचा पर्यायी पुरवठा केला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
📍 *आमच्या राज्यात पैसे गुंतवा, ममता बॅनर्जी यांचे उद्योगपतींना आवाहन*
असे आवाहन राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केले. उद्योजकांनी पश्चिम बंगालमध्ये मोठया प्रमाणावर गुंतवणूक करावी, कधी काळी राज्यात एका वर्षांत 75 लाख मनुष्य दिवसांचे नुकसान होत असे, मात्र आज हे प्रमाणे शून्यावर आले आहे असे त्यांनी उद्योजकांच्या एका मेळाव्यात सांगितले. तसेच केंद्र सरकारने विकासात आडकाठी आणू नये अशी विनंती त्यांनी केली.
📍 *महागाई जास्त वाढली नाही- निर्मला सितारामन*
भारतात महागाई खुप जास्त वाढलेली नाही असे विधान अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केले आहे. सितारामन या सध्या वॉशिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आणि जागतिक बँकेने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये सहभागी झाल्या आहेत. तिथेच बोलताना सीतारामन यांनी महागाई एवढी काही वाढलेली नाही असे विधान केले आहे.

Comments
Post a Comment