जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही📰 5JANUARY


*जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही📰 5JANUARY📆*

Nifty50: 17,805.25
⬆ +179.55(1.02%) 
Sensex : 59,855.93
⬆ +672.71(1.14%)
*अनाथांची माय हरपली, सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली !*
पद्मश्री सेवाव्रती सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात दुःखद निधन झाले आहे. अतिशय खडतर संघर्षाला सामोरे जात त्यांनी अनाथ  मुलांवर मायेचे छत्र धरले होते, सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. आज त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना सोशल मिडियावर व्यक्त होत आहे. अनाथांच्या या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली !

*भारतीयांचा रेकॉर्डब्रेक UPI वापर, 456 कोटी डिजिटल ट्रान्झॅक्शन*
भारतीयांचा रेकॉर्डब्रेक UPI वापर केल्याची आकडेवारी पुढे आली आहे. 4 वर्षात 70 पटींनी डिजिटल पेमेंट वाढले आहे. वर्ष 2021 मध्ये डिसेंबर महिन्या अखेर 456 कोटी डिजिटल ट्रान्झॅक्शनची संख्या नोंदविली गेली. आतापर्यंतची UPI ट्रान्झॅक्शनची रेकॉर्डब्रेक संख्या ठरली आहे. रकमेचा दृष्टीकोनातून विचार केल्यास सव्वा आठ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची देवाणघेवाण करण्यात आली.

*सेन्सेक्स 672 अंकांनी वाढला, निफ्टी 17800 च्या वर बंद*
आशियाई बाजारातील वाढीदरम्यान सलग तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ
झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक एक
टक्क्यापेक्षा जास्त वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स मधील 25 आणि
निफ्टीतील 35 शेअर्स वाढीसह बंद झाले. या सर्वांच्या आधारे आज
सेन्सेक्स 672 अंकांच्या वाढीसह 59,855 वर बंद झाला आणि निफ्टी
179 अंकांच्या वाढीसह 17,805 वर बंद झाला.

*इंटरनेटशिवाय करता येणार डिजीटल व्यवहार, RBI ची मंजुरी*
RBI ने ऑफलाइन डिजीटल पेमेंट्सबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता गावांमध्ये आणि दुर्गम भागांत डिजिटल व्यवहार ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. 200 रुपयांचे कमाल 10 व्यवहार म्हणजे 2000 रुपयांपर्यंतचे ऑफलाइन डिजिटल व्यवहार करता येणार आहे. ऑफलाइन पेमेंटचा वापर ग्राहकाच्या मंजुरीनंतर करण्यात येऊ शकतो. ऑफलाइन पेमेंट असल्यामुळे ग्राहकांना एसएमएस अथवा ई-मेल द्वारे मिळणारा मेसेज काही वेळेनंतर मिळणार आहे.

*हैदराबाद-आधारित ई-बस निर्माता ऑलेक्ट्राचे समभाग एका वर्षात 540% वाढले आहेत*
भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेकचे शेअर्स गेल्या 12 महिन्यांत 540% वाढले आहेत. कंपनीने अलीकडेच हैदराबादच्या सीमेवर 150 एकर उत्पादन युनिट स्थापन करण्याची घोषणा केली, ऑलेक्ट्रा चेअरमन के.व्ही. प्रदीप यांनी सांगितले की ट्रक निर्मात्याशी भागीदारी जाहीर केल्यानंतर कंपनी आता इलेक्ट्रिक ट्रक मार्केटमध्ये पाऊल टाकू इच्छित आहे.

Comments

Popular posts from this blog

जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही

जानुन घ्या आजचा दिवसातील घडामोडी

*Global-Market Insights*