जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही 15MARCH

*जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही 15MARCH📆*

Nifty50: 16,871.30
⬆ +240.85(1.45%) 
Sensex : 56,486.02
⬆ +935.72(1.68%)



*शेअर बाजारात तेजी कायम, सेन्सेक्स 935 अंकांनी वाढून बंद*
तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 935 अंकांनी (1.68% ) वाढून
आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज (14 मार्च) शेअर बाजारात प्रचंड :56,486 वर बंद झाला आणि निफ्टी 241 अंकांनी (1.45% ) वाढून 16,871 वर बंद झाला. आज बँकिंग क्षेत्रात उत्साहाचे वातावरण होते. त्यांचा स्टॉक 2 ते 3% ने वाढला. पेटीएमचा स्टॉक 12% पेक्षा जास्त घसरून 680 रुपयांवर बंद झाला. ही त्याची आतापर्यंतची नीचांकी पातळी आहे.

*हिंदुस्थान युनिलिव्हरने चहा, कॉफीच्या किंमती वाढवल्या*
कच्चा माल, मनुष्यबळ आणि उत्पादन खर्च यांच्यात झालेल्या दर वाढीमुळे हिंदुस्थान युनिलिव्हरने कंपनीने बु कॉफीचे दर 3 ते 7 टक्क्यांनी वाढविले आहेत. तर ताजमहालच्या किंमतीत 3.7 ते 5.8 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून बुक बॉड टीच्या किंमतीत 14 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर कंपनीने आधीच्या उत्पादनाची विक्री करण्यास परवडत नसल्याचं कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.

*पेटीएमसाठी बॅडन्यूज, 12 टक्क्यांनी शेअर घसरले*
आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. त्यानंतर सोमवारी शेअर बाजार सुरु होताच पेटीएमच्या शेअर्समध्ये 12 टक्क्यांनी घसरण झाली. तसेच पेटीएमचा शेअर आज सर्वात निच्चांकी पातळीवर घसरला. सुरुवातीला पेटीएमच्या एका शेअरची किंमत 2150 रुपये होती. त्यात आतापर्यंत मोठी घसरण झाली आहे. आज या शेअर्सची किंमत जवळपास 685 रुपये आहे.

*अर्थमंत्री सादर करणार जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प*
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होत आहे. सकाळी 11 वाजल्यापासून कामकाज सुरू होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज जम्मू-काश्मीरसाठी 2022-23 या आर्थिक वर्षाच अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

*चीनमधील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांना एका दिवसात 52 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे*
सोमवारी चिनी शेअर्समध्ये घसरण झाल्याने चीनच्या 78 सर्वात श्रीमंत टायकूनची एकत्रित निव्वळ संपत्ती एका दिवसात 52 अब्ज डॉलर्सनी घसरली. बाटलीबंद पाण्याची कंपनी नॉन्गफू स्प्रिंगचे संस्थापक आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झोंग शानशान यांना सर्वाधिक नुकसान झाले, त्यांच्या संपत्तीत $5 अब्जची घट झाली. Tencent च्या Pony Ma ची एकूण संपत्ती $3.3 अब्जने घसरून $35.2 अब्ज झाली.



Comments

Popular posts from this blog

जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही

जानुन घ्या आजचा दिवसातील घडामोडी

*Global-Market Insights*