जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही📰 8 JANUARY📆*
* जाणून घ्या दिवसासाठी सर्व काही 📰 8 JANUARY 📆* Nifty50: 17,812.70 ⬆ +66.80(0.38%) Sensex : 59,744.65 ⬆ +142.81(0.24%) * सेन्सेक्स 143 अंकांनी वर बंद, तर निफ्टी 17800 च्या पार* आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी दिवसभर शेअर बाजारात अस्थिरता होती. परंतु सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही शेवटी वाढीसह बंद करण्यात यशस्वी झाले. सेन्सेक्स मधील 15 आणि निफ्टीतील 32 शेअर्स वाढीसह बंद झाले. या सर्वांच्या आधारे सेन्सेक्स 142.81 अंकांच्या वाढीसह 59,744.65 वर बंद झाला आणि निफ्टी 66.80 अंकांच्या वाढीसह 17,812.70 वर बंद झाला. * रिलायन्सची डुंझो कंपनीत 25.8 टक्के भागीदारी* रिलायन्स रिटेलनं ऑनलाईन किराणा माल देणाऱ्या डुंझो कंपनीत 25.8 टक्के भागीदारी खरेदी केली असून 1786 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डुंझो हा भारतातील स्टार्टअप क्षेत्रातील एक यशस्वी प्रयोग म्हणून नावाजला जातो. रिलायन्स रिटेलने गुंतवणूक केल्याने किराणा मालाची जलद होम डिलिव्हरी करणाऱ्या या उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. कबीर विश्वास यांनी 2016 साली डुंझोची स्थापना केली होती. * 35 वर्षापासून रखडलेला साखर कारखान्...
Bolo
ReplyDelete